वात्रटिका

बोध आणि शोध

कुणाचे पाळीव झाल्यावर
सांगेन त्यावर भुंकावे लागते
मालक विरोधकांच्या अंगावर
वेळोवेळा थुंकावे लागते

कुत्र्यांना हाकालले जाते
कुत्र्यांना खिदडले जाते
तरीही भुंकने न थांबल्यास
कुत्र्यांना बदडले जाते

आपण कोण आहोत
ज्याने त्याने बोध घ्यावा
आपल्या ओंगळ अवस्थेचा
मनातून एकदा शोध घ्यावा.

श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *