वैरागचे आरोग्य अधिकारी डॉ.गुंड यांची चिखर्डे येथे बदली , त्यांच्या जागी डॉ.उकरंडे

वैराग (प्रतिनिधी )
वैराग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ . जे.बी. गुंड यांची चिखर्डे तालुका बार्शी येथे नुकतीच बदली झाली असून त्यांच्या जागी प्राथमिक आरोग्य केंद्र आगळगावचे डॉ . समिर उकरंडे यांना पदभार देण्यात आला आहे .
डॉ .गुंड यांचे कडे सन २०१६ पासून वैराग प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त पद भार होता . डॉ.जयवंत गुंड यांनी अतिरिक्त असलेला वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदभार रद्द करण्याबाबत केलेल्या विनंती अर्जा वरून तसेच त्यांचे प्रकृती अस्वास्थ व covid-19 च्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन डॉ .गुंड यांना प्राथमिक आरोग्य केंद्र चिखर्डे ता . बार्शी या त्यांच्या मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होणे कामी कार्यमुक्त करून येथील अतिरिक्त पदभार आगळगावचे वैदयकिय अधिकारी डॉ .समिर उकरंडे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेश येईपर्यंत सोपविण्यात आला आहे .याबाबत चा आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी १८ सप्टेंबर २०२० रोजी काढला होता .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *