कोरोणा मुक्त गाव करणेचा सौंदणेतील युवकांचा निर्धार

मोहोळ । प्रतिनिधी
जगभरासह महाराष्ट्रात कोरोनाचा
दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरुद्ध आता सौंदणे गावातील तरुणाई एकवटली आहे.सौंदणे येथील निराधार व गरजू कुटुंबांना तसेच फ्रंटलाईन वर्कर यांना गावातील युवावर्ग व नोकरदार यांच्या मार्फत अन्नधान्य किट व सोबत सॅनिटायझर ,मास्कचेही वाटप करण्यात आले आहे .

  • 30 कुटुंबाना अन्नधान्याचे किट वाटप
  • गावातील निराधार व गरजूंना मदत
  • गावातील युवावर्ग व नोकरदार यांचा उपक्रम
  • परगावी राहणार्‍यांचेही आर्थिक योगदान
  • वारंवार हायड्रोक्लोरिक ची फवारणी करण्यात येत आहे. गावातील रोजंदारी जाणारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना लॉकडाऊन च्या काळात अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले आहे. 30 कुटुंबाला किट वाटप करण्यात आले मात्र कोणत्याही लाभार्थ्यांचा अन्नधान्याचा किट देताना फोटो घेतला नाही.अन्नधान्याचे किट लाभार्थ्यांना घरपोच देण्यात आली.
  • सौंदणे गाव आज जरी प्रतिबंधित क्षेत्र असले तरी ते लवकरच पूर्ण कोरोना मुक्त करण्याचा युवकांनी निर्धार केला आहे. तरुणांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर गाव लवकरच कोरोना मुक्त होईल. वरील सर्व कामे तरुण वर्गणीतून करत आहेत.
  • यामध्ये प्रमुख उपस्थिती ॲड. प्रेमनाथ सोनवणे, अमोल माळी , ग्रामपंचायत सदस्य – सज्जन माळी ,राहुल भानवसे ,विनायक भानवसे ,ग्रामीण पोलीस, तसेच गजानन माळी , ग्रामीण पोलीस -समाधान भानवसे ,सागर माने ,लखन राऊत, संतोष नामदे, लक्ष्‍मण वाघमारे, सुशांत सुरवसे, वैभव भानवसे, आण्णा सोनवणे इत्यादी यासाठी परिश्रम घेत आहेत .
Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *