धामणगाव सरपंचपदी एस के पाटील तर ,उपसरपंच सवीता कदम

वैराग :बार्शी तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी एस के पाटील तर उपसरपंच पदी सविता कदम यांची बिनविरोध निवड झाली .
धामणगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत माजी मंत्री दिलीप सोपल यांचे खंदे समर्थक तानाजी पाटील माधव मसाळ किसन भोसले या त्रिमूर्तीनी योग्य नियोजन करून 11 पैकी सहा जागा जिंकून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले
सरपंच पदासाठी एस के पाटील तर उपसरपंच पदासाठी सविता नानासाहेब कदम यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी जमदाडे यांनी ही निवडणूक बिनविरोध जाहीर केली यावेळी तानाजी पाटील गट नाना पाटील गट विवेकानंद बोधले गट सर्व नूतन सदस्य उल्का ढेकणे चांदन डोळसे पंकज देशमुख सुप्रिया जगताप शीतल पाटील रोहिणी ताटे नागनाथ ढेकणे महेश बोधले संजय ढावारे यांचा सत्कार नूतन सरपंच एस के पाटील यांच्या हस्ते करण्यात आला

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *