गतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड

बार्शी(प्रतिनिधी)
राज्यातील गतवर्षीचा विमा राहिलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा १६ जून रोजी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी राज्याचे कृषी आयुक्त व पिकविम्याचे राज्य प्रमुख यांना पुणे येथील कार्यालयात निवेदननाद्वारे दिला.
यावेळी अमोल चौधरी, संदीप चौधरी, मनोज गवळी, गणेश चौधरी आदींसह शेतकरी उपस्थित होते.
राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली . मग विमा कंपन्या त्या पंचनाम्याच्या आधारे भरपाई का देत नाहीत?असा सवाल करून,लवकरच शेतकऱ्यांच्या खातेवर विमा कंपन्यांनी परतावा जमा करावा . अन्यथा विमा कंपनीचे मालकांच्या घरावर व संबंधित सर्व कार्यालयावर तीव्र स्वरूपाची आंदोलने केली जातील असे शंकर गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना सांगितले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *