नरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध

मोहोळ (प्रतिनिधी)मोहोळ तालुक्यातील नरखेड च्या वार्ड क्रमांक ५ मध्ये उमेश पाटील गटाच्या ओपन महिलेचा फॉर्म चुकून ओपन पुरुष मधून भरल्याने तो बाद ठरला होता , त्या जागेची पोटनिवडणुक व्हावी म्हणून ‘नोटा ‘ ला म्हणजे यापैकी कुणीही नाही ‘या पर्यायाला निवडून आणायचे असे पाटील गटाचे अगोदरच ठरले होते व तसा प्रचारही करण्यात आला होता . ‘नोटा ‘ ची पण जागा उमेश पाटील यांचीच येणार यात शंकाच नव्हती . या मुळे नरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते मिळाली आहेत .
वार्ड क्रमांक ५ मध्ये एकूण ३ जागा असून ओपन महिला , ओपन पुरुष , व ओबीसी पुरुष असे आरक्षण आहे . यात सचिन शिंदे व अकबर इनामदार यांचा विजय झाला असून ते पाटील गटाचेच उमेदवार आहेत .
नरखेड ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष – उमेश पाटील गटाने वर्चस्व सिद्ध केले असून १३ पैकी १२ जागांवर विजय मिळवित एकहाती सत्ता स्थापन केली आहे . विजयी ‘नोटा’ जागेबद्दल लवकरात -लवकर पोट निवडणूक घेणेबाबत विनोद बलभिम पाटील यांनी निवडणूक विभागाला तातडीचा अर्ज दिला आहे.
विनोद बलभीम पाटील नरखेड ता. मोहोळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नरखेड यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की , नरखेड ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकित प्रभाग क्रमांक पाच मधील सर्वसाधारण महिला प्रवर्गातील निवडणुकीत ‘नोटा’ ला (म्हणजे यापैकी कुणीही नाही ‘या पर्यायाला ) सर्वाधिक मतदारांनी पसंती दिल्याने सदर जागेची फेरनिवडणूक घेणेत यावी .
वार्ड क्रमांक पाच मध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गातील मतमोजणी मध्ये अनुक्रमे पुढीलप्रमाणे मतदान झाले आहे – १) नोटा मतदान 434 २ ) कोल्हाळ दिपाली अविनाश – 143 ३ )खंदारे सविता हरिदास – 163 वरील वस्तूस्थितीच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 16 नोव्हेंबर 2018 च्या संदर्भातील आदेशान्वये असे नमूद केले आहे , जर नोटा ला लगतच्या उमेदवारापेक्षा जास्त मतदान झाल असेल तर त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेण्याची तरतूद आहे .सदर बाब लक्षात घेता नरखेड मधील प्रभाग 5 मध्ये नोटाला सर्वाधिक मते असल्याने मतदारांनी उर्वरित दोन्ही उमेदवारांना नाकारले असून त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवावी व निवडणूक घेण्यात यावी . याबाबत विनोद बलभिम पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्त , जिल्हाधिकारी सोलापूर ,उपविभागीय अधिकारी पंढरपूर व तहसीलदार मोहोळ यांना निवेदन दिले आहे .

रात्री उशिरा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खंदारे सविता हरिदास – 163 मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित केले .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *