मोहोळ च्या नगराध्यक्षपदी श्रीमती- शाहीन शेख विजयी

मोहोळ (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसची आघाडीच्या मोहोळ  नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी कॉग्रेसच्या श्रीमती शाहीन शेख यांचा ११ विरुद्ध ६  मतांनी विजयी झाला .त्यानी शिवसेनेच्या नसिमा बोंगे यांचा पराभव केला .                  प्रथमच व्हीडीओ कॉन्फरसद्वारे घेण्यात आलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी  पिठासीन अधिकारी म्हणुन उपजिल्हाधिकारी अरूणा गायकवाड यांनी काम पाहीले . व्हीडीओ कॉन्फरसींगद्वारे घेतलेल्या या मतदानामध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती शाहीन शेख यांच्या बाजुने अकरा तर  शिवसेनेच्या नसीमा सिकंदर  बोंगे यांच्या बाजुने  सहा जणांनी मतदान केले .दहा सदस्यासह राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या ताब्यात असणाऱ्या या नगर षरिषदेत विरोधकापैकी शिवसेनेच्या एका नगरसेवकांने आपले मतदान  नगराध्यक्ष शाहीन शेख यांना दिले .
नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्धल त्यांचा माजी आ.राजनजी पाटील, माजी जि .प. सदस्य शहाजहान शेख  यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार  यशवंत माने यांनी सत्कार केला . यावेळी  माजी  नगराध्यक्ष रमेश बारसकर, माजी नगराध्यक्षा वंदना सुरवसे , उपनगराध्यक्ष शौकत तलफदार,नगरसेवक व गटनेते प्रमोद डोके ,अर्चना वायचळ, सुवर्णा गाढवे ,संतोष खंदारे , दत्ता खवळे , मनिषा फडतरे ,अतुल गावडे नगरसेवकासह ,मुश्ताक शेख ,कॉग्रेसचे किशोर पवार,सुरेश शिवपुजे, कृष्णदेव वाघमोडे ,रशीद पठाण ,दाजी कोकाटे ,अमजद शेख आदी उपस्थित होते

नगराध्यक्ष पदासाठी विजयी झाल्यानंतर श्रीमती -शाहीन शेख यांंचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार झाला .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *