मोहोळ येथे कंटेनर व टँकरचा अपघात दोन्ही वाहने जळून खाक


मोहोळ (प्रतिनिधी )
        मोहोळ शहरातील कुरुल रोडवर हॉटेल वैष्णवी जवळ केमिकल टँकरची व मालवाहू गाडीची समोरासमोर भीषण धडक होवून अपघात दोन्ही वाहने जळून खाक झाली
. सदरची घटना आज २२ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली .
या झालेल्या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही . घटनास्थळी पोलिस निरीक्षक अशोक सायकर , पोलिस – निलेश देशमुख आदी कर्मचाऱ्यांनी तात्काळ भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली .
आग विझवण्यासाठी अनगरच्या लोकनेते साखर कारखान्याचे अग्निशामक दल घटनास्थळी पोहचले .केमिकल टॅकरमधील चालकास शरद गाढवे , महादेव गाढवे , रूषीकेश माने , हॉटेल वैष्णवीचे मालक – शंकर मुसळे आदींनी तात्काळ मदत करून चालकाचा जीव वाचविला . सुमारे तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली असून या दुर्घटनेमुळे विजापुर महामार्गावर गाड्याच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या . 

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *