राज्यातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेत पात्र कोविड रुग्णांना मोफत उपचार मिळणेची मौलाना आझाद मंचची मागणी

बार्शी (प्रतिनिधी) महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे . रेमडेसिवीर इंजेक्शन असो की ऑक्सिजन सिलेंडर सर्वच ठिकाणी रुग्णांची लूट सुरु आहे .रुग्णालयांची बिलंही लाखोंच्या घरात येत असल्याने सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून पात्र कोविड रुग्णांना अंगीकृत रुग्णालयातून निःशुल्क उपचार करण्याची मागणी सोलापूर जिल्हा मौलाना आझाद विचार मंचने मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , महसुलमंत्री ,जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे केली आहे .

पिवळे रेशन कार्ड , अंत्योदय, अन्नपूर्णा योजना व केसरी शिधाधारक कुटुंबियांसाठी 1 एप्रिल 2017 रोजी महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत 971 उपचार व शस्त्रक्रियेचा समावेश करण्यात आला आहे. कोविड रुग्णांचा समावेश या योजनेत आहे. सदर योजना विनाशुल्क असून रुग्णांना अंगीकृत रुग्णालयातून निःशु सेवा उपलब्ध आहे.
त्याचबरोबर उपरोक्त योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य मित्राची नेमणूक करण्यात आली आहे . कोविड प्रादुर्भावामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील खाजगी सरकारी व मनपाचे रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडलेली आहे.
केसरी, पिवळ्या शिधापत्रिका धारक पात्र रुग्णांना उपरोक्त योजनेअंर्तगत मोफत उपचार न करता खाजगी रुग्णालये दोन ते तीन लाख रुपयांचे बिल आकारत आहेत. सामान्य गरीब रूग्ण सोने-नाणे, घरे विकून व तसेच व्याजाने रक्कम काढून बिले अदा करीत आहेत. सदर योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही .

कोविडमुळे शासनाने लाँक-डाऊन केल्याने असंख्य छोटे-मोठे व्यापारी आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना दिलासा मिळण्यासाठी सरसकट सर्वच कोविड रुग्णांना मोफत उपचार मिळणे आवश्यक आहे . या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील खाजगी, सहकारी व इतर रूग्णालयात विना कागदपत्र सर्व रुग्णांना मोफत उपचाराचा निर्णय घ्यावा. त्याबाबत त्वरीत परिपत्रक पारित करून योग्य आदेश देण्यात यावे अशी मागणी सोलापूर जिल्हा मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हाध्यक्ष – इस्माईल पटेल यांनी निवेदनात केली आहे .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *