दत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन

उपळे दुमाला (प्रतिनिधी )बार्शी तालूक्यातील उपळे दुमाला येथे डॉ . आकाश जाधव यांचे दत्तप्रभू क्लिनिक उपळे दुमाला व परिसरातील लोकांच्या सेवेत १३ जून पासुन सुरू झाले . याचे उद्घाटन बार्शी येथील डॉ . गणेशकुमार सातपुते (एम डी मेडीशिन ) यांच्या हस्ते  व डॉ. मुकूंद कुलकर्णी याच्या प्रमुख उपस्थीतीत करण्यात आले .
सध्या कोरोना महामारीचे संकट आहे . अशा परिस्थितीत बाहेर कोठेतरी नोकरी करण्यापेक्षा मायभूमितच राहून लोकांना सेवा देवून समाजश्रणाची उतराई करता येईल या उद्देशाने आपण उपळे दुमाला येथे दत्तप्रभू क्लिनिक सुरु केले आहे . असे उद्घाटन प्रसंगी डॉ. आकाश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमास उपस्तीथ डॉ .सुनिल काळोखे डॉ. रणजीत बुरगुटे डॉ चंद्रशेखर आंबे डॉ राहुल ताटे व बार्शी मार्केट कमिटीचे संचालक अनिल जाधव , माजी सरपंच – यशवंत बुरगुटे , उपसरंपच -नितीन बुरगुटे ,माजी उपसरपंच – रामेश्र्वर बुरगुटे , प्रा.संजय पुजारी ,जेष्ठ नेते विकास पासले , राजाभाऊ जाधव ,स्वप्नील बुरगुटे आदी मान्यवर उपस्थित होते .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *