रमजानमध्ये जिकरे कुटूंबाकडून रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या टाक्याचे पवित्र दान

बार्शी (गणेश घोलप )
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव व कोविड रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासल्याने अनेक रुग्णांचा जीव गेला आहे. याअनुशंगाने बार्शीतील दानशुर जिकरे कुटूंबाकडून गोरगरीब जनतेला ऑक्सिजन वेळेत व मुबलक मिळावा व रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होऊ नये म्हणून ग्रामीण रुग्णालयात सुमारे 10 ऑक्सिजन टाक्यात मोफत ऑक्सिजन ( प्राणवायु ) भरुन देण्यात आला आहे.

रमजानच्या पवित्र्य महिन्यांत त्यांनी गोरगरीब रुग्णांसाठी ऑक्सिजन देऊन पुण्याचे कार्य केले आहे.
या कार्यक्रमासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शितल बोपलकर, बांधकाम ठेकेदार बसवराज कुंटोजी, इस्माईल जिकरे, असिफ जिकरे, एजाज पटेल, सद्दाम शेख, अजिम जिकरे, मुजाहिद जिकरे, शोएब शेख, बापू पाटील, पत्रकार गणेश घोलप, नर्स स्वाती बसवंत, सुमन बोचडे, आरोग्य कर्मचारी ज्ञानेश्वर डोंगरे आदी उपस्थित होते.

जिकरे कुटूंब बार्शी शहर व परिसरात जिकरे इलेक्ट्रानिक्स या उद्योग क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून आजपर्यंत त्यांनी छोट्या – मोठ्या सामाजिक उपक्रमास मोलाची मदत करीत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

 

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *