उजनीतील पाण्याच्या लढयासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी एकजूट करावी : गायकवाड

पंढरपूर I प्रतिनिधी
उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी वर्गासाठी वरदायनी असून प्रत्येकवेळी या धरणातील पाणी पळवापळवीचा प्रयत्न केला जात असतो. सध्याही अशाप्रकारे उजनीचे पाणी इंदापूर तालुक्यासाठी नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र जनहित शेतकरी संघटना, उजनी पाणी बचाव समिती, संभाजी ब्रिगेड, प्रहार संघटना अशा संघटनांनी आणि शेतकरी वर्गाने उठविलेल्या आवाजामुळे हा पाणी पळविण्याचा निर्णय रद्द करण्याचा प्रयत्न सुरू आहे . मात्र आद्यापही लेखी आदेश नाहीत .

पाणी प्रश्नी जिल्ह्यातील शेतक-यांवर सतत होणारा अन्याय दुर करण्यासाठी आता सोलापूर जिल्ह्यातील तमाम शेतक-यांनी एकजूटीने या उजनीच्या पाणी बचाव लढाईसाठी सज्ज झाले पाहीजे असे मत जनहित शेतकरी संघटनेचे औदुंबर गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.


आपली भुमिका व्यक्त करताना औदुंबर गायकवाड यांनी सांगितले कि, उजनीचे पाणी इंदापूर तालुक्यासाठी नेण्याचा निर्णय झालेनंतर यामध्ये जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर (भैया )देशमुख व पाणी बचाव समितीचे पदाधिकारी यांच्यासह इतर संघटनांनी लक्ष घालुन हा निर्णय रद्द करण्याचा प्रयत्न सुरू केला. यासाठी उजनी जलाशयातील जलसमाधी आंदोलन असेल, पुणे येथे झालेली बैठक असेल अशा अनेक घडामोडी घडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांसाठी हा अन्यायकारक निर्णय ठोस होतो कि काय असे वाटत होते.
परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी वर्गावर अन्याय करणारा हा निर्णय रद्द झालाच पाहीजे व उजनीतील एक थेंबही पाणी इंदापूर तालुक्याला जाऊ दिले जाणार नाही. अशी भक्कम भुमिका घेवून या संघटनांनी उजनी येथील भीमानगर येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. त्याला शेतकरी, महिला व इतर संघटनांचा पाठींबा मिळत आहे. तर आंदोलनातील वाढता गंभीरपणा पाहून काही लोकप्रतिनिधीही सहभागी होऊ लागल्याचे दिसून येत आहे. परंतु शेतकरी वर्गाने या आंदोलनाला आपल्या स्वःताची लढााई समजून या आंदोलनासाठी पाठींबा दिला पाहीजे.
जर जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने या आंदोलनामध्ये एकजूटीने पाणी पळवापळवीच्या विरोधात भुमिका घेतल्यास जिल्ह्यातील लोकप्रितनिधींनाही याची दखल घेण्यास भाग पडणार आहे. शेतकरी, महिला व संघटनांनी एकत्रीत येत या आंदोलनाची व्याप्ती वाढविल्यास शासनाला याचा विचार करून लवकरच लेखी आदेश देत हा पाणी नेण्याचा निर्णय रद्द करण्यास भाग पडेल.
त्यासाठी उद्या उजनीतील पाणी आपल्यासाठी नाहीसे झाल्यानंतर काही करण्यापेक्षा आजच या सर्व गोष्टींचा विचार करून उजनीच्या पाणी पळवा पळवीच्या विरोधातील लढाईमध्ये योग्य विचाराने सहभागी झाले पाहीजे.
तसेच ही उजनीची लढाई उभी करीत असताना शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करीत अंमलबजावणीस प्रतिसाद देण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले.


Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *