॥ घराघरात शिवजयंती गडकाव्यचित्रांचे कौटुंबिक प्रदर्शन॥


वैैैैैराग : वैैैैैराग येथिल उपक्रमशिल शिक्षक व रानफूल साहित्य व्यासपीठ चे संस्थापक हरिश्चंद्र खेंदाड यांनी छत्रपती संभाजी महाराज चौक ,मोहोळ रोड, वैराग येथे ” शंभूराजे ” होम पार्क मध्ये हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी वाचन संस्कृती वृध्दीगंत व्हावी व आजच्या पिढीला गडकिल्ल्यांची ओळख व्हावी या उद्देशाने गडकाव्य चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. एक आगळी वेगळी साहित्यीक आणि वैचारिक शिवजयंती साजरी करण्यासाठी हरिश्चंद्र खेंदाड यांनी गडकाव्यांजली या त्यांच्या सदरात वृत्तपत्रातून प्रकाशीत झालेली त्यांची स्वलिखीत ११९ गडकिल्ल्यावरील गडकाव्ये व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या खेंदाड यांच्या ३६ स्वलिखीत कविता यांचा समावेश असणार असून छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर वृतपत्रातून प्रकाशित झालेले मान्यवरांचे माहितीपूर्ण लेख, गडकिल्ल्यांची चित्रे , शिवकालीन हत्यारांची चित्रे इत्यादीं माहिती खेंदाड यांनी संकलीत करून त्याची कल्पकतेने मांडणी करून १३ ‘संदर्भ कात्रणसंग्रह ‘ स्वतः पुस्तक बांधणीची हस्तकला जपत बायडिंग केले असून तेही या प्रदर्शनात असणार आहेत.हे प्रदर्शन दिवसभर शिवप्रेमीसाठी खुले असणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदा शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

याआव्हानाला प्रतिसाद देणारे उत्तम उदाहरण म्हणून या कौटुंबिक शिवजयंती निमितच्या गडकाव्य चित्र प्रदर्शनाकडे पाहता येईल. हरिश्चंद्र खेंदाड हे अशा प्रकारची वैचारिक आणि कौटुंबिक शिवजयंती गेली दहा वर्ष झाली साजरी करत आहेत. यंदाचे हे ११ वे वर्ष असून शिक्षक, विद्यार्थी, बालचमू, साहित्यीक,कवी,शिवप्रेमी,स्नेही,नातेवाईक या विचारांच्या शिवजयंतीला दिवसभरात भेटी देत असतात.कोवीडची नियमावली पाळत मास्कचा वापर करून हे गडकाव्यचित्र प्रदर्शन पाहता येईल.असे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *