वैराग नगरपंचायतीचा डॉ .कोल्हे यांनी स्वीकरला पदभार , तर प्रशासक म्हणून तहसिलदार – सुनिल शेरखाने

वैराग । प्रतिनिधी : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार माढ्याचे मुख्याधिकारी डॉ .चरण कोल्हे यांनी शुक्रवारी ग्राम विकास अधिकारी – सचिन शिंदे यांच्याकडून वैराग नगरपंचायतीचा अतिरिक्त पदभार स्वीकारला .
कोरोनाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असून मला फक्त वैरागकरांची त्सासाठी साथ हवी आहे, असे आवाहन पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी व्यक्त केले .
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य – निरंजन भूमकर यांनी मुख्याधिकारी डॉ .चरण कोल्हे स्वागत केले .

वैराग नगरपंचायतीचे कर्तव्य आणि अधिकार पार पाडण्यासाठी बार्शीच्या तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, माढ्याच्या मुख्याधिकाऱ्यांना निवडणूक विषयक व नियमित कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी अतिरिक्त पदभार स्वीकरण्याचे आदेश १९ मे रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बजावले होते .त्यानुसार डॉ .चरण कोल्हे यांनी शुक्रवारी २१ मे रोजी वैरागचा अतिरिक्त पदभार स्वीकरला .
महाराष्ट्र नगरपरिषदा ,नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ अन्वये यथोचित रचना होईपर्यंत बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने यांची वैराग नगरपंचायती संबंधित सर्व अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे .

बार्शी तहसीलदार : सुनिल शेरखाने

यावेळी संगम डोळसे, नगर अभियंता रामभाऊ जाधव, कार्यालयीन अधिक्षक -विलास मस्के,कमलाकर लोखंडे, लक्ष्मण माने, अमजद शेख, सुदाम खेंदाड, सचिन पाणबुडे, किरण वाघमारे,बाळासाहेब पांढरमिसे ज्ञानेश्वर पवार, आणासाहेब जगताप, , स्वप्नील चौधरी,सागर खांडेकर,राहुल खेंदाड,सतीश रड्डी,अतुल जाधव,सागर सुक्रे आदींसह कार्यालय ,आरोग्य व पाणीपुरवठा विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *