निराधार उपाशी झोपू नये म्हणून अन्नदा व दिशा संस्थेकडून खिचडी किटचे वाटप

वैराग (प्रतिनिधी) अन्नदा सामाजिक संस्था ठाणे आणि दिशा समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आळजापूर ता. बार्शी येथे आळजापूर, कासारी, लमाणतांडा आणि सहारा वृद्धाश्रम गौडगांव या ठिकाणी अन्नदा खिचडी किटचे वाटप करण्यात आले.
कोरोना मुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, सध्या खूप गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे. लोकांना रोजगार नसल्यामुळे उपासमार होत आहे. अन्नदा सामाजिक संस्था ठाणे यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात गरीब, गरजू, निराधार व्यक्ती उपाशी झोपू नये म्हणून मल्टीग्रेट, दालखिचडी किट वाटप करण्यात येत आहे.
आळजापूर ता. बार्शी येथिल दिशा समाज विकास संस्थेच्या माध्यमातून २०० गरीब महिला, मजूर, निराधार व्यक्तींना अन्नदा भोजन किट वाटप करीत आहे. आळजापूर, कासारी, लमाणतांडा कासारी आणि गौडगाव येथील सहारा वृद्धाश्रम मध्ये अन्नदा खिचडी किटचे वाटप करण्यात आले.
आळजापूरच्या सरपंच मोनिका घुगे, कासारीच्या सरपंच सुवर्णा अंबुरे, उपसरपंच नितेश लोंढे तसेच दिशा संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वडवे, हरिश्चंद्र वडवे, सहारा वृद्धाश्रमचे संस्थापक – राहुल भड, आदी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *