वीज पडून म्हैस व गायीचा जागीच मृत्यू अवकाळी मुळे शेतक-यांचे मोठे नुकसान


वैराग (प्रतिनिधी) बार्शी शहरासह तालुक्यात बुधवारी झालेल्या अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. अचानक वादळी वारे आणि जोराचा पाऊस आल्याने पानगाव परिसरात एक गाय आणि एक म्हैस यांचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पानगाव ,वैराग , उपळे दुमाला आदी परीसरात एका आठवड्यात अवकाळीचा दुसरा तडाखा बसला असून काल विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासहसह सुमारे पाउण तास पावसाने हजेरी लावली.


उंडेगाव रस्त्यावरील अरुण जांबुवंत भोंग यांची म्हैस तर इंद्रजीत दामू भुतेकर यांची गाय वीज पडून मृत्युमुखी पडली आहे.या दोन्ही घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबधित विभागाच्या वतीने घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.दरम्यान हरिभाऊ राजाराम काळे यांच्या लिंबू बागेतील काही झाडे वादळी वा-याने जमीनदोस्त झाली आहेत.या अवकाळीमुळे आंबा तसेच लिंबाच्या फळबागाला फटका बसला असून शेतकऱ्यांची ऊन्हाळी मशागतीची कामेही लांबणीवर पडली आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *