शिवस्पर्श प्रतिष्ठानच्या वतीने वैरागमध्ये कोरोना योद्धयांचा सन्मान


वैराग : वैराग ( ता. बार्शी ) येथे शिवस्पर्श प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस, आरोग्य कर्मचारी, पत्रकार, ग्रामपंचायत कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, आदींचा कोरना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

शिवस्पर्श प्रतिष्ठानच्यावतीने पारंपारिक पद्धतीने शिवाजी महाराजांचा अभिषेक करण्यात आला. महिलांचा पाळणा व हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. विशेषतः वैराग मधील 161 महिलांनी या कार्यक्रमासाठी सहभाग नोंदवला होता.
मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.

तर कोरोना योद्धा सन्माना मध्ये सात आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर ,दहा होमगार्ड, पोलीस अधिकारी व पोलिस, अकरा वैराग ग्रामपंचायत कर्मचारी, दोन सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, नऊ पत्रकार, दोन वैद्यकीय अधिकारी आदींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, वृक्ष व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

शिवस्पर्श मंडळाचे शिवजयंतीचे हे सहावे वर्ष आहे. यापूर्वीही या मंडळाने अनेक विधायक उपक्रम राबवले आहेत. कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष – गणेश मचाले, उपाध्यक्ष -स्वप्नील डोळसे, खजिनदार – आशिष गुंड, अजय काळोखे, बाळासाहेब दळवी, कुलदीप वायकर ,समीर पठाण, साहिल शेख, सत्यम गोंदकर, बाळासाहेब कराड, जीवन मोटे, ऋषिकेश निंबाळकर आदींनी परिश्रम घेतले

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *