बावी ग्रामस्थांतर्फे आदर्श शिक्षक रवींद्र आगलावे यांचा सत्कार

वैराग (प्रतिनिधी ) बार्शी तालुक्यातील बावी(आ) येथील नवोपक्रमशील शिक्षक रविंद्र प्रमोद आगलावे यांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषद करमाळा यांचे कडून गुणवंत शिक्षक पुरस्कार व पंचायत समिती शिक्षण विभाग, करमाळा यांचे तर्फे ऑनलाइन शिक्षणसाठी” थँक अ टीचर” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या गौरवास्पद कामगिरीबद्दल बावी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कोरोना महामारीच्या काळात राज्यातील सर्व प्राथमिक शाळा बंद आहेत पण शिक्षण सुरू आहे.लॉकडाऊन काळात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून चिखलठाण केंद्रात “ऑनलाइन एकत्रित केंद्रस्तरीय
अध्यापन “उपक्रम राबवून प्राथमिक शिक्षक रवींद्र आगलावे यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.तसेच सन 2009 पासून ते राज्यस्तरीय
तज्ञ मार्गदर्शक म्हणून आदर्श कार्य करीत आहेत. त्यांच्या या गौरवास्पद कामगिरीबद्दल बावी ग्रामस्थांच्या वतीने भूमिपुत्रांचा सन्मान करण्यात आला.यावेळी छगन आगलावे,साहेबराव आगलावे,ग्रामपंचायत सदस्य प्रताप मिठे,विठ्ठल आगलावे ,बाबासाहेब डोईफोडे,अतुल आगलावे,शंकर आगलावे,अविनाश काशीद,युवराज पाटील,संभाजी पाटील,सुधीर आगलावे,भालचंद्र आगलावे,रामेश्वर आगलावे ,पोपट आगलावे,शिवाजी आगलावे व बावी ग्रामस्थ उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *