बार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह

  उपळे दुमाला (प्रतिनिधी ) अंतरराष्ट्रीय  बाल कामगार दिन संपुर्ण बार्शी तालुक्यात १२ जुन रोजी साजरा करण्यात आला . १२ जुन ते १९जुन पर्यंत बाल कामगार विरोधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे .
या सप्ताहाच्या निमित्ताने बाल व किशोर वयीन बालकांना कामावर ठेवणे तसेच १४ ते १८ या वयोगटातील किशोर वयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रिया मध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे . तसे अढळून आल्यास त्यांना २० ,००० ते ५०.००० हजार रू पर्यंत चा दंड वा ६ महिने ते २ वर्षे पर्यंत कारावास शिक्षा होऊ शकते . बाल कामगारांना कामावर ठेवल्याचे निदर्शनास आल्यास सरकारी कामगार अधिकारी बार्शी कार्यालयाचे अधिकारी – अशोक कांबळे यांनी एक पत्रक काढून बार्शी तालुक्यातील सर्व अस्थापना ,दुकाने ,कारखाने ‘ चित्रपट गृहे , मोटार गँरेज व अन्य व्यवसायीकांना अंतरराष्ट्रीय  बाल कामगार दिनाच्या निमित्ताने बाल कामगार न ठेवण्याचे जाहीर आवाहन केले आहे .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *