वैराग येथील दरोड्याच्या गुन्हयातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई.

वैराग (प्रतिनिधी ) सोलापूर जिल्हयामध्ये घडणार्‍या गुन्हयातील आरोपींवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण पोलीस अधीक्षक -श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी अवलंबवले आहे . त्यासाठी जिल्हयातील दरोडा, जबरी चोरी व इतर गुन्हयामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींविरूध्द दाखल पूर्वीचे गुन्हे, केलेली प्रतिबंधक कारवाई याची माहिती तपासण्यात आली असता वैराग येथिल सचिन भोसले व त्याचे इतर साथीदारांवर मोक्का अन्वये कारवाई करण्यात आली .
स्वस्तात सोने देतो म्हणून २० एप्रिल २०२१ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वैराग ता .बार्शी येथे घरी बोलावून सोने न देता फसवून , मारहाण करून हिरा अंबर चव्हाण (वय 32) रा. वारजे रामनगर पुणे यांचेकडील ४ लाख ५० हजार रोख रक्कम जबरीने घेऊन मारहाण करून , धमकी देऊन हाकलून दिल्या प्रकरणी २२ एप्रिल २०२१ रोजी सचिन जहांगीर भोसले , जहांगीर भोसले , शोभा भोसले व तीन अनोळखी पुरुष व एक महिला (रा.सर्व वैराग ) यांच्यावर वैराग पोलीसांत गुन्हा दाखल झाला होता .
वैराग पोलीसात सदर आरोपी विरुद्ध 174/2021 भा.द.वि.का.क. 395, 397, 420 अनुसार गुन्हा दाखल आहे .सदर टोळीतील सदस्यांवर वेळोवेळी कायदेशीर कारवाई करूनही त्यांचे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये बदल होत नसल्याने प्रभारी अधिकारी, वैराग पोलीस ठाणे यांनी सदर आरोपीविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता त्यास मंजूरी प्राप्त झाल्याने सदर आरोपीविरूध्द मोक्का लावण्यात आला. त्याचा पुढील सविस्तर तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी अभिजित धाराशिवकर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती. तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक – अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक – सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली वैराग पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक – विनय बहिर, पोलीस उपनिरीक्षक – राजू राठोड, सफौ -संदीप काशीद, निलकंठ जाधवर, पोलीस हवलदार – मोहन मनसावाले, अमोल गावडे यांनी बजावली .

या गुन्हयातील अटक व निश्पन्न आरोपींनी संघटीत टोळी तयार करून त्या टोळी मार्फत कधी एकटयाने किंवा संयुक्तपणे किंवा टोळीतील इतर सहका-यामार्फत हिंसाचाराचा वापर करुन व जबरदस्ती करुन गुन्हे करण्याचे बेकायदेषीर कृत्य चालू ठेवले असल्याचे दिसून आले होते.
त्यांनी वैराग, कुर्डुवाडी, बार्शी तालुका, सोलापूर तालुका जि. सोलापूर ग्रामीण आनंदनगर, उस्मानाबाद शहर, उस्मानाबाद ग्रामीण, जि. उस्मानाबाद या पोलीस ठाणे हददीत व आसपासच्या परीसरात जिवे ठार मारणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घरफोडी करणे, चोरी करणे, फसवणुक करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *