शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबाला कोरोना काळात प्रार्थनाचा मदतीचा हात

वैराग (प्रतिनिधी)कोरोना महामारीच्या काळात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबीयाची मोठी परवड झाली . सोलापूर स्थित प्रसाद मोहिते यांच्या प्रार्थना फाउंडेशनने आत्महत्याग्रस्त १५ कुटूंबाला किराणा साहित्य देवून त्यांची भागवली भूक . कोरोना महामारीच्या काळात प्रार्थना फाउंडेशन मदतीला धावून आल्याने लाभार्थ्यांच्या चेह-यावर समाधान दिसत होते .

वैराग ता बार्शी येथील संतनाथ मंदिरात दहिटने,सुर्डी,रुई,पानगाव,शेळगाव,लाडोळे,ढोराळे,गौडगाव, मालवंडी,वैराग येथील 15 आत्महत्याग्रस्त कुटूंबाना मान्यवरांच्या हस्ते किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी हभप -रंगनाथ काकडे,विष्णू तुपे,संगीता मोहिते,संस्थापक – प्रसाद मोहिते,पत्रकार -शांतीलाल काशीद,शिवशंकर गोसावी,आशपाक बागवान, गोविंद तिरणगारी,मल्लेश तेली,भाग्योदय इपोळे, रवी संकुल,चंद्रकांत भारते,मुत्तपा भारते,सिद्धू इपोळे उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील 100 शेतकरी आत्महत्या कुटूंबाला देणार मदतीचा हात

आपण कोणाच्यातरी आयुष्याची भाकरी होऊ शकत नाही पण एक वेळची भूक नक्कीच भागवू शकतो या उदात्त हेतूने प्रार्थना फाऊंडेशन पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यातील 100 शेतकरी आत्महत्या कुटूंबाला मदतीचा हात देणार आहे.

यापूर्वी पहिल्या टप्यात बार्शी तालुक्यातील कारी, नारी,उंबरगे,बार्शी,पिंपरी (सा) येथील 14 कुटुंबियांना घरपोच किराणा साहित्याचे वाटप केले आहे.तर दुसऱ्या टप्प्यात 500 कुटूंबाला किराणा साहित्याचे वाटप करण्याचा प्रार्थना फाऊंडेशनचा मानस असल्याचे प्रसाद मोहिते यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रार्थनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील 32 मुलांचे पालकत्व स्विकारून आत्महत्याग्रस्त कुटूंबाला एक आशेचा किरण दाखवला आहे.

आत्महत्याग्रस्त कुटूंबाला शासकीय मदतीसाठी प्रयत्न

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे,ज्या कुटूंबाला आर्थिक मदत मिळाली नाही आश्या कुटूंबाचा फेरसर्व्हे करावा,मोफत गॅस कनेक्शन मिळावे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा आदी मागणीसाठी शासन दरबारी निवेदन देणार व वेळप्रसंगी आत्महत्याग्रस्त कुटूंबासोबत आंदोलन करणार.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *