क्रेनच्या साह्याने ५०१किलो फुलांचा हार घालून भव्य नागरी सत्कार

वैराग (प्रतिनिधी )सासुरे ता . बार्शी येथील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांचा भव्य नागरी सत्कार क्रेनच्या साह्याने 501 किलो फुलांचा हार घालून करण्यात आला .युवा उद्योजक सोमनाथ गिरी ,मेजर जगन्नाथ आदमाने ,अतुल मलमे मित्र मंडळ , अशोक खेंदाड व मित्रपरिवार , तसेच वैराग भागातील मित्र परिवार व सासुरे ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा अनोखा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला . यावेळी गावातील पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व मार्गदर्शक यांचाही सत्कार करण्यात आला .सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन युवा उद्योजक सोमनाथ गिरी यांच्यावतीने करण्यात आले होते .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *