सर्व धर्मियांच्या वतीने घाणेगावात शिवप्रतिमेचे पुजन

घाणेगाव ता बार्शी येथे अठरा पगड जातींना सोबत घेऊन रयतेच राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती घाणेगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली.घाणेगाव येथील युवकांनी गावातील बारा बलुतेदारांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.

आनंद काशीद बोलताना म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीनां सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले त्या सर्व जातींना छत्रपती पुजनाचा पहीला अधिकार आहे म्हणून घाणेगाव येथील सर्व बारा बलुतेदार यांच्या हस्ते पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा कृतीतून चालवण्याचा प्रयत्न करत आहोत.शिवप्रतिमा पूजनाचा सुरू केलेला पायंडा भविष्यात देखील सुरू ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी पप्पू लोहार,मामा गोसावी,दिपक बंडगर,प्रशांत स्वामी,
सोमनाथ पाडूळे,सोहम जाधव,विकास नेटके,सुहास शिंदे,सोमनाथ जाधव,अक्षय मोरे, सुदाम शिंदे, किरण शिंदे,आकाश जाधव,किशोर जाधव,सुधीर कुलकर्णी,सुधीर बचुटे व घाणेगाव ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन विजय शिंदे यांनी केले व आभार आण्णा पाडूळे यांनी मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *