भारतीय बंधुता संघाचा “समाजभूषण पुरस्कार ” वाघमारे यांना जाहिर

सोलापूर (प्रतिनिधी) उस्मानाबाद येथिल सामान्य कुटूंबातील गणेश रानबा वाघमारे सुमारे दहा वर्षांपासून विविध सामाजीक कार्ये करताहेत . त्यांच्या कार्याची भारतीय बंधुता संघाने दखल घेवून त्यांना यावर्षीचा “समाजभूषण पुरस्कार” जाहीर केला आहे.

ग. रा. वाघमारे हे उस्मानाबादसारख्या मराठवाडयातील औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या परिसरात रहात असले, तरी देशभरातील घडामोडींवर त्यांची नजर असते! या जागरूकतेतूनच आपल्या परीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवाण्याचा प्रयत्न मागील अनेक वर्षापासून ते सातत्याने करत आलेले आहेत. स्त्री जन्माचे स्वागत करणे, त्यासाठी रूग्णालयात जाऊन नवजात स्त्री अर्भकांसाठी नव्या कपड्यांची भेट देणे, नदीजोड प्रकल्पासारखा देशव्यापी प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत राहणे, भ्रष्टाचारास विरोध करणे, विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करणे अशा विविध प्रकारच्या कामांतून ते समाजाची निस्वार्थ सेवा सुमारे दहा वर्षापासून बजावत आहेत. जातनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष इतकेच नाही तर पक्षनिरपेक्ष भूमिकेतून ही सर्व कामे ते पार पाडतात . त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारतीय बंधुता संघाच्या वतीने दिला जाणारा सन २०२१ चा ‘समाजभूषण पुरस्कार’ ग. रा. वाघमारे यांना जाहीर करण्यात आला आहे.

भारतीय बंधुता संघाने २०१९ पासून समाजासाठी विविध क्षेत्रांत महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या गुणीजनांना दरवर्षी पुरस्कार दिले जातात . शाल, प्रमाणपत्र व पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच वाघमारे यांना पुरस्कार प्रदान केला जाईल असे भारतीय बंधुता संघाचे अध्यक्ष -प्रा. डॉ. रविनंद होवाळ यांनी सांगितले .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *