शेळगांव (आर) च्या सरपंचपदी प्रभावती विजय बादगुडे तर उपसरपंच पदी शाहू आप्पासाहेब कचरे यांची बिनविरोध निवड

सरपंच , उपसरपंच निवडीनंतर जल्लोष साजरा करताना सर्व सदस्य ,प्रमुख मान्यवर , ग्रामस्थ आदी .

वैराग : बार्शी तालुक्यातील शेळगांव (आर) येथिल ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये 20 वर्षानंतर सत्तांतर झाले . माजी सरपंच – सुरेश ( नाना )अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली 11पैकी 6 उमेदवार निवडून आणून सत्तापरिवर्तन करून सत्तास्थापन केली आहे .
सरपंचप -प्रभावती विजय बादगुडे , उपसरपंच – शाहू आप्पासाहेब कचरे ,मंगल नागणे, शोभा देडे, राजाभाऊ गायकवाड, नानासाहेब सपाटे, या सर्व नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करीत त्यांची सवादय गावात मिरवणूक काढणेत आली . यावेळी विजय बादगुडे, बाळासाहेब गायकवाड, प्रकाश ,गायकवाड, शिवाजी जाधव, सचिन बादगुडे, भानुदास नागणे, रवींद्र सपाटे आदी उपस्थित होते .
निवडणुक निर्णय अधिकारी – शंकर पाथवटे यांनी काम पाहिले . यावेळी ग्रामसेवक -गोपाल सुरवसे , नागणे – पोलीस पाटील . श्रीकांत बादगुडे , सुहास गायकवाड ,आण्णा गिलबिले तात्या सिरसट , कादर तांबोळी , यांनी प्रशासकीय काम पाहीले .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *