वात्रटिका – पक्षांची करामत

हरणांच्या कळपात
कोल्हे आणि लांडगे
पदवीधर, शिक्षकांत
पक्षीय धनदांडगे

राजकीय पक्षांची
भारीच करामत
आमदारकी वाटप
जणूकाही खिरापत

विवेक जरा वापरूया
नको पैसा आणि पक्ष
प्रतिनिधी निवडताना
थोडे तरी व्हा दक्ष…!

श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *