वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती उत्साहात साजरी


बार्शी (प्रतिनिधी)
वस्ताद लहुजी साळवे यांची शनिवार १४ नोव्हेंबर रोजी सासुरे ता. बार्शी येथे २२६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .जयंती निमित्त “महापुरुष आमची विरासत ” या विषयावर लहुजी क्रांती मोर्चाचे राज्य संघटक , तथा बामसेफचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष – भाऊसाहेब कांबळे यांनी उपस्थितांना महापुरुषांच्या योगदानाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
बार्शी तालुका लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी तालुका अध्यक्ष -अक्षय साळुंके, माजी सरपंच – तानाजी धडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक – भारत मुक्ति मोर्चाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष – रणजीत सोनवणे यांनी केले. तर आभार -विकास बनसोडे यांनी मानले. तालुका संयोजक अभिजीत पवार ,सतीश धडे ,नितीन धडे,मार्तंड धडे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

वस्ताद लहुजी साळवे
Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *