वैराग – सोलापूर रोडवरील टेम्पो – एसटी बस व क्रेन अपघातात ५ गंभीर तर१० किरकोळ जखमी


वैराग (प्रतिनिधी )
वैराग – सोलापूर रोडवर वैराग पासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावरील (बंडेवार विहीर ) ठिकाणी रविवारी दुपारी सव्वा एक च्या सुमारास टेम्पो (छोटा हत्ती ) – एसटी बस व क्रेन यांचा अपघात होऊन ड्रायव्हरसह बसमधील प्रवाशी जखमी .झाले .यामध्य्ये ५ गंभीर तर १० किरकोळ जखमी झाले आहेत .

सध्या बार्शी – सोलापूर नवीन महामार्गाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे . त्यामुळे शेळगाव ते वैराग रस्ता सध्या खोदाई , मुरूम टाकून भरणे , साईडपट्टीची रुंदी वाढविणे तसेच रोडच्या दुतर्फा कडेची झाडे तोडणे अशी कामे चालू आहेत . आज रविवार २९ रोजी दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास वैरागहून सोलापूरच्या दिशेने बेकरी साहित्य घेऊन निघालेला टेम्पो (छोटा हत्ती ) (क्रमांक एम . एच .१३ ए एन -२५९२ )बंडेवार विहीर येथिल पुलाजवळ आला असता पाठीमागून एसटीने ( क्रमांक एम एच 07 सी7334 ) धडक दिल्याने समोरील क्रेनवर आदळून पलटी झाला . बार्शी -सोलापूर विनाथांबा बसचा ब्रेक फेल झाल्याने टेम्पोला ओव्हरटेक करताना धडक बसून समोरील वाहन चुकवत बस झाडावर आदळली . यामुळे एसटीतील कांही जण जखमी झाले आहेत . अपघातामध्ये एसटी ड्रायव्हर – विजय स्वामी वय ४६ ( रा .वडाळा ) टेम्पो वाहन चालक – गोवींद वाघमारे वय – ३५ (वैराग ) ट्रेन ड्रायव्हर जखमी झाले . यांच्यासह एसटीतील प्रवासी जखमी झाले आहेत . जखमींना वैराग ,बार्शी , सोलापूर येथे उपचारासाठी नेण्यात आले . या अपघातामुळे सुमारे एक तास वाहतूक खोळंबली होती .,पोलीस पाटील – सुधाकर देवकते , अमर करंडे आदींनी टेम्पोत अडकलेल्या ड्रायव्हरला बाहेर काढून मदत केली .
घटनास्थळी वैराग पोलीस स्टेशनची टिम पोहचली असता – रामकृष्ण शिंदे आदींनी वाहतूक व्यवस्था सुरुळीत केली .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *