वैरागचे पोलीस कॉंस्टेबल – बहिरे अँटीकरप्शनच्या जाळ्यात

वैराग (प्रतिनिधी): बार्शीहून नुकतेच बदलीने आलेले वैराग पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलीस कॉंस्टेबल ईसामिया बहिरे यांना तीन हजाराची लाच घेताना १ आक्टोंबर गुरूवारी अॅन्टिकरप्शनच्या पथकाने सापळा रचून अटक केले आहे .

यातील तक्रारदार यांचे विरुद्ध वैराग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून, सदर गुन्ह्यांचे तपासात मदत करण्यासाठी व पुढील कारवाई न करण्यासाठी पो.काॅ.बहीरे यांनी 15000/- रुपये लाचेची मागणी करून, तडजोडी अंती 5000/- रुपये लाच मागणी करून, त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 3000/- रुपये लाचेची रक्कम बहिरे यांनी स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडले आहे.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तथा पुणे व सोलापूर येथिल लाचलुच प्रतिबंध विभागातील अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर येथिल पोलीस निरीक्षक -कविता मुसळे, पोलीस निरीक्षक – जगदीश भोपळे ,पोलीस – चंगरपल्लु, पोलीस – स्वामी, पो.शिपाई – सनके यांनी सापळा रचून कार्यवाही केली

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *