वैराग नगरपंचायती साठी शासकिय स्तरावर हालचालींना वेग

वैराग (प्रतिनिधी )सोलापूर जिल्हयातील व बार्शी तालुक्यातील सुमारे ४० हजार लोकसंख्येच्या सर्वात मोठ्या असणाऱ्या वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करणे संदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाने बुधवार २ डिसेंबर २०२० रोजी सोलापूर जिल्हा प्रशासन अधिकारी यांना पत्राव्दारे तात्काळ माहिती मागविली आहे .
सोलापूर जिल्ह्यातील मौजे वैराग, ता.बाशी, जि.सोलापूर या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्याबाबतचा प्रस्ताव सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयांकडून ७ फेब्रुवारी २०२० रोजी शासनाच्या नगर विकास विभागास पाठविण्यात आला होता.त्यामुळे सदर प्रस्तावाचे अवलोकन करून प्रस्तावासोबत अनुसूची-अ मध्ये प्रस्तावित नगरपंचायतीमध्ये समाविष्ट करावयाचे क्षेत्र (सर्व्हे क्रमांकाची यादी) व अनुसूची-ब (संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशिल) याबाबतची सविस्तर माहिती सोलापूर जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी शासनास तात्काळ सादर करावी असे पत्रात म्हटले आहे .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *