ऐन दिवाळीत वैरागमध्ये घरफोड़ी , कागद पत्रासह ५६ हजार चोरले

वैराग(प्रतिनिधी)
वैराग ता . बार्शी येथे घराच्या दरवाजाचे कडी -कोयंडा तोडून घरात ठेवलेले ५६ हजार रोख व कागदपत्राची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली असून याबाबत वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही घरफोडीची घटना शुक्रवारी संध्याकाळी अकरा ते शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान वैराग – माढा रोडवरील धायगुडे प्लॉट येथे घडली.

याबाबत वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी रमेश मोतीराम गायकवाड ( रा. वैराग. धायगुडे प्लॉट ) यांच्या घराचे अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत, घरातील धान्य कोठीत ठेवलेली ५५ हजार रुपये व पॉकेट मध्ये ठेवलेले एक हजार पाचशे रुपये रोख असे एकूण ५६ हजार पाचशे रुपये, व कागदपत्रे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. अशी फिर्याद रमेश गायकवाड यांनी वैराग पोलिसात दिली असून यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वैराग हद्दीत अलीकडे घरफोडी, दुकान फोडी व दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *