उस उत्पादकांना हेक्टरी दोन लाखाची मदत द्यावी

वैराग (प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे राज्यासह जिल्हयातील सीना, भीमा व अन्य नद्या व ओढ्यांच्या काठावरील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने संपूर्ण शेतकरी नागवला आहे . त्यामुळे नुकसानग्रस्त झालेल्या उस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख, तूर उत्पादक शेतकऱ्यांना दीड लाख व सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत त्वरीत मिळावी, अशी मागणी शंभू सेनेचे संस्थापक अतुल माने- पाटील यांनी एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी, तहसिलदार माढा यांच्याकडे केली आहे .

तहसिलदार माढा यांना निवेदन देताना अतुल माने- पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते .
Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *