भोगावती नदीकाठी पुराच्या पाण्यात दोन म्हशींचा मृत्यु

वैराग (प्रतिनिधी )पिंपरी (सा) ता. बार्शी परिसरात शुक्रवारी १८ रोजी मध्यरात्री अचानक झालेल्या मुसळधार पावसाने भोगावती नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले होते .

यामध्ये पिंपरी (सा) येथील शेतकरी अजित नागनाथ काटमोरे यांच्या दोन मुरा जातीच्या म्हशींचा भोगावती नदीच्या पात्रातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
अजित काटमोरे यांच्या भोगावती नदीच्या कडेला दोन म्हशीं बांधलेल्या होत्या .

त्यामध्ये एक दुभती तर दुसरी गाभण म्हैस होती .मध्यरात्री झालेल्या पावसामूळे भोगावती नदीच्या पाण्यात दोन्ही म्हशींच्या नाका -तोंडात पाणी गेल्याने त्यांचा गुदमरून मृत्यु झाल्याचे सकाळी दिसताच काटमोरे कटूंबीयांचा अश्रूंचा बांध फुटला. त्यामुळे काटमोरे यांचे मोठ आर्थिक नुकसान झाले आहे.

कुटूंबाचा गाडा चालवण्यास आर्थिक हातभार लावणाऱ्या तसेच मालकाचा लळा लागलेल्या म्हशींचा मृत्यु झाल्याने काटमोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पिंपरी (सा) येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . वैभव पासले यांनी घटनास्थळी भेट दिली. शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात केला. अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे डॉ . पासले यांनी सांगितले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *