अवैधरित्या बंदूक बाळगणार्‍या दोघांना जामखेड येथे अटक , 95 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त


जामखेड (प्रतिनिधी)जामखेड शहरात अवैधरित्या बंदुकीची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांचेकडील 95 हजार किंमतीच्या 4 अवैध बंदुका व 6 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली . सदरची कारवाई गुन्हे शोध पथकाच्या टिमने १२ मार्च रोजी केली असून दोघां विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3/25 व 7/26 नुसार गुन्हा दाखल झाला आहे .
याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार जामखेड शहरात अवैधरित्या बंदुकीची खरेदी विक्री होत असल्याची बातमी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड मिळाली होती . त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात पोहेकॉ.संजय लाटे ,पोकाँ आबासाहेब आवारे ,पोकॉ संग्राम जाधव, पोकों.अविनाश ढेरे ,पोकों.विजयकुमार कोळी ,पोकॉ.अरूण पवार, पोकॉ.संदिप राऊत ,पोकॉ.संदिप आजबे ,यांच्या टिमने ऋषी ऊर्फ पप्पु मोहन जाधव याच्या घरी तपनेश्वर गल्ली,जामखेड येथे छापा टाकला .
यात 25 हजार रू.किमतीचे स्टीलचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे मिळुन आले.ऋषी जाधव याचेकडे अधिक चौकशी केली असता सदरची बंदुक व काडतुसे दिपक अशोक चव्हाण रा.तपनेश्वर गल्ली,जामखेड याच्याकडुन खरेदी केल्याचे त्याने सांगितले.
त्यानंतर गुन्हे शोध पथकाच्या टिमने आपला मोर्चा दिपक अशोक चव्हाण कडे वळविला व 3 अवैध पिस्टल व 4 जिवंत काडतुसे विक्री करण्याच्या उद्देशाने त्याच्या जवळ सापडल्याने त्याला ताब्यात घेतले .

सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.मनोज पाटील सो.,मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.सौरभ अग्रवाल सो. व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग श्री. आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात , सफी.परमेश्वर गायकवाड ,पोहेकॉ.संजय लाटे ,पोकों आबासाहेब आवारे पोका संग्राम जाधव, पोकॉ.अविनाश ढेरे ,पोकॉ.विजयकुमार कोळी ,पोकों.अरूण पवार, पोकॉ.संदिप राऊत,पोकॉ.संदिप आजबे .पोका.सचिन देवढे ,पोकां सचिन पिरगळ यांनी केली आहे.

याप्रकरणी पोकॉ.आबासाहेब आवारे यांचे फिर्यादीवरून ऋषी ऊर्फ पप्पु मोहन जाधव वय-22 वर्ष रा.तपनेश्वर गल्ली,जामखेड व दिपक अशोक चव्हाण वय-32 वर्ष रा.तपनेश्वर रोड,जामखेड या दोघांविरोधात जामखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला आहे .

पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.आण्णासाहेब जाधव व पो.नि.संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोसई राजेंद्र थोरात हे करीत आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *