. . .तर मंत्रालय किंवा कृषी आयुक्तालयात तीव्र आंदोलन करणार…शंकर गायकवाड

कृषी आयुक्तालयात केलेल्या आंदोलनानंतर निवेदन देताना संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड व शेतकरी

बार्शी(प्रतिनिधी) नुकतेच शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली पुणे येथे पिकविमा कंपन्या व कृषी आयुक्तालयावरील आंदोलनानंतर शासन खडबडून जागे झाले

मागणी प्रमाणे संपूर्ण राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पिकविमा मंजूरीचे आदेश काढले परंतु विमाभरपाई १५ एप्रिलच्या आत हेक्टरी काढनी पुर्व १६७०० तर काढनी नंतरच्या नुकसानीसाठी २७५४० रू. देण्याचे आश्वासन दिल्याप्रमाणे जर शेतकऱ्यांच्या खातेवर जमा केले नाही तर १६ एप्रिल रोजी मंत्रालय किंवा कृषी आयुक्तालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी बोलताना सांगीतले.
तसेच ज्या शेतकऱ्यांना यापुर्वी विमा कमी मिळाला किंवा मिळालाच नाही आशा राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी ९७६७६८४९३४ या माझ्या मोबाईलवर संपर्क करून १६ एप्रिलच्या २०२१ च्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *