आगळगाव-बाभुळगाव शिवारात चोरट्याचा धुमाकूळ, विजेचे साहित्य चोरीस

बार्शी (प्रतिनिधी ) बार्शी तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आगळगाव, बाभुळगाव शिवारात चोरट्यानी धुमाकूळ घालुन एकाच रात्रीत 27 पोलवरील अॅल्युमिनियम तार  ,इलेक्ट्रीक मोटार लंपास करूण पोल तोडुण 1 लाख विस हजार रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे.

आगळगाव येथील विज वितरण कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंता –  वर्षा धनाजी सोनवणे वय-42 वर्षे,  रा.पाटील प्लाॅट बार्शी यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे .

फिर्यादीत म्हटले आहे की , वर्षा सोनवणे ऑफीसला जात असताना  रणजित  जाधवर रा. बार्शी वरिष्ठ तंत्रज्ञ शाखा कार्यालय आगळगाव यांचा मोबाईलवर फोन आला व सांगितले की  आगळगाव,

बाभऴगाव शिवारातील खराडे अँडिशनल डिपी वरिल 27 पोलवरिल 26गाऴ्याची लघु दाब वाहिणीच्या ऑलुमिनीयमच्या ,त्रिफेजच्या चार तारा कोणीतरी आज्ञात चोरट्याने कट करून चोरून नेल्या आहेत.  

लघु दाब वाहिणीच्या ऑल्युमिनीयमच्या ,त्रिफेजच्या चार तारा अंदाजे 1,16,000 हजार रू किंमतीच्या कोणीतरी आज्ञात चोरट्याने चोरून नेहुन त्यातील दोन पोल मोडुन अंदाजे 4000हजार रू किंमतीचे नुकसान केले आहे

तसेच साईट वरती पाहणी करित असताना कालीदास भागवत झिने,रा.बाभळगाव ता.बार्शी यांचे विहरीवरील ईलेक्ट्रीक मोटार चोरी गेलेस समजले आहे .बार्शी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलिस करत आहेत

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *