अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दहा वर्षे कारावास


बार्शी (प्रतिनिधी ) :अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी गोपाळ दुर्योधन पाटिल (वय २१) यास दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे . बार्शी सेशन कोर्टात जिल्हा व सत्र न्यायधीश अजितकुमार भस्मे यांनी दिलेल्या निकालात हि शिक्षा दिली आहे.
याबाबत – २५ मार्च २०१८ रोजी पीडित मुलिस आरोपीने त्याच्या घरी बोलवून मोबाईल दाखवून अत्याचार केला.
पीडितेच्या आईने कुर्डूवाडी पोलिस स्टेशन येथे आरोपींविरुद्ध २०१८ साली गुन्हा दाखल केला होता.आरोपी हा पीडितेचा नातेवाईक असताना असा प्रकार करण्यात आला होता.
यात पीडितेच्या आजोबांची व आईचीही साक्ष महत्वाची ठरली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद व आरोपीविरुद्ध असलेले सबळ पुरावे याचा विचार करता विशेष जिल्हा न्यायधीश भस्मे यांनी आरोपीस बाल लैंगिक अत्याचार कायदयान्वये १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.यात सरकार पक्षातर्फे ॲड.दिनेश देशमुख यांनी महत्वाची भूमिका बाजावली.यामध्ये कुर्डूवाडी पोलीस निरीक्षक-ओमासे,पो.कॉ.बोराडे,शेळके,
जगताप यांनी विशेष तपास केला होता.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *