सुशांत काटमोरे ची राहुरी विद्यापीठ क्रिडा संघटनेच्या अध्यक्षपदी निवड

sushant katmore news

वैराग (प्रतिनिधी) बार्शी तालुक्यातील पिंपरी (सा)येथील सुशांत काटमोरे यांची राहुरी विद्यापीठ क्रिडा संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.कृषि पदवीधर संघटना राज्यभर कृषि व संलग्न पदवीधर आणि शेतकरी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी गेले नऊ वर्षे कार्य करीत आहे.

आता नव्याने कृषि पदवीधर संघटनेचा क्रिडा विभाग सुरु करण्यात आला आहे. क्रीडा विभागाचे राज्य मुख्य समन्वयक तथा अध्यक्ष सचिन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सुशांत काटमोरे यांची निवड करण्यात आली.

सदर विभाग हा संघटनेने कृषि क्षेत्रात शिक्षण घेत असलेले विदयार्थी व खेळाडूंच्या विविध समस्या सोडवण्यासाठी निर्माण केला आहे. भविष्यात ICAR च्या क्रिडा स्पर्धा,

अश्वमेध,देशपातळीवरील आंतर विद्यापिठ क्रिडा स्पर्धा मधील पदक धारक अथवा सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या या विभागाच्या माध्यमातुन समस्या सोडविल्या जाणार आहेत.

क्रीडा संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शांताराम काटमोरे,तानाजी काटमोरे,अनिल काटमोरे,हेमंत काटमोरे,प्रमोद काशीद,सुजित सातपुते व पिंपरी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *