विद्यार्थी सहाय्यक समिती महाराष्ट्राभर वृक्ष लागवड करणार

Meeting of the entire Maratha community in Barshi on Maratha reservation issue


बार्शी (प्रतिनिधी ) पुणे येथील विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्र राज्यात वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला असून त्याची बार्शी शहरामधुन  नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करूण सुरूवात करण्यात आली.

यावेळी शिवाजी महाविद्यलायचे उपप्राचार्य व्ही .जे .देशमुख,अॅड.देशमुख, बार्शी वृक्ष संवर्धन समिती चे सदस्य उपस्थित होते.

समितीचा हा उपक्रम बार्शी तालुक्याच्या हरित बार्शी या संकल्पनेला हातभार लावणारा आहे,बार्शीच्या वैभवात भर पडणारा आहे ,अस नगराध्यक्ष तांबोळी यांनी म्हटलं.तसेच वृक्षांना उन्हाळ्यात पाणी देण्याची जबाबदारी नगरपालिका घेईल अस आश्वासनही त्यांनी दिल.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समर्थ देशमुख,कृष्णा देवकर,गोपाळ माळी यांनी परिश्रम घेतले. समितीचे आजी-माजी विद्यार्थी या उपक्रमात सहभागी आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *