सोलापुर जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करावा, राष्ट्रवादी किसान सभेची मागणी

मुंगशी ( काशीनाथ क्षिरसागर ) : सोलापुर जिल्हयात यंदा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने तसेच परतीचा पाऊस व पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे .हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हतबल झाला आहे . त्यामुळे सोलापूर जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसगट आर्थिक मदत मिळावी याबाबत किसान सभेच्या वतीने उपमुख्यमंत्री , कृषिमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे .जिल्हाध्यक्षा – शुभांगी जाधव,

अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तुर, कांदा,ऊस, आदी पिकांचे तसेच द्राक्ष, पेरू, सिताफळ , डाळींब,आदी फळबागांचे तसेच भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . काही ठिकाणी शेतातील मातीबरोबर पिकचं वाहुन गेली आहेत . त्यामुळे पंचनामे करायला पिकच शिल्लक नाहीत. नदीकाठच्या गावांना याचा अधिक फटका बसला आहे . नदीच्या पुरात पिकाबरोबर जनावरे देखील वाहून गेली आहेत . यामुळे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानातुन शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सोलापुर जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट नुकसान भरपाई मिळावी. याबाबत कृषिमंत्री दादाजी भुसे व जिल्हाधिकारी – मिलिंद शंभरकर व उपमुख्यमंञी – अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा सोलापूर यांनी निवेदन पाठविले आहेत . यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रमुख – विजयाताई भोसले, जिल्हाध्यक्षा – शुभांगी जाधव, जिल्हाउपाध्यक्षा- अनिता क्षीरसागर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *