‘सर ‘ चित्रपट २४ ला झाला प्रदर्शित , हंगामा ,एम एक्स प्लेअर वर प्रदर्शित पहिला मराठी चित्रपट

बार्शी (प्रतिनिधी ) – वैराग सारख्या ग्रामीण भागात तयार झालेला प्रणित देशमुख लिखित, दिग्दर्शित विनानुदानित शिक्षकांच्या जीवनावर भाष्य करणारा ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणारा पाहिला बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट येत्या 25 ऑक्टोबर पासून सर्वांना पाहता येणार आहे.
करोणा महामारी मुळे ओटिटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणारा सोलापूर जिल्यातील ‘सर ‘ हा पहिला मराठी चित्रपट आहे. यापुर्वी ओटिटी वर मोठमोठे हिंदी चित्रपट याअगोदर प्रदर्शित झालेले आहेत .
त्यामुळे प्रेक्षकांना आता घरबसल्या आपल्या मोबाईल वर सुद्धा हा चित्रपट सहज पाहण्यास उपलब्ध होणार आहे.
कसदार अभिनयाने नटलेल्या या चित्रपटात एक वास्तव विषयाची कथा सर्वांना पहावयास मिळणार असून या चित्रपटात बहुतांश शिक्षक अभिनय करताना पहावयास मिळतील.
विनानुदानित शिक्षकांची अवस्था सांगणाऱ्या या चित्रपटात शिक्षण क्षेत्रातील संपूर्ण वास्तव मांडलेले असून एक सुंदर लावणी सुद्धा आपल्याला ठेका धरायला लावणार आहे.
शिवाय या चित्रपटाने महासत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भारताचे भवितव्य धोक्यात घालणारे निर्णय घेणाऱ्या शासन व्यवस्थेला पण निर्णय घेताना हजार वेळा विचार करावा लागेल. वीस वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या गुरुजनाना न्याय मिळवून देण्यात सहभागी व्हा असे आवाहन चित्रपटाच्या टीम च्या वतीने करण्यात येत आहे.
चित्रपटाचे छायाचित्रण अमोल लोहार यांनी तर संकलन चेतन डमरे यांनी तर कार्यकारी निर्माता म्हणून जमीर कुरेशी यांनी केले आहे.चित्रपटाची गीते सुहास ढेकणे यांची असून संगीत दिग्दर्शन सुरेश जाधव यांनी केले असून डॉ.जयभीम शिंदे व शुभांगी जोशी यांनी गायली आहेत.
चित्रपटाचे कलाकार- राहुल फलटणकर,वैष्णवी जानराव,विशाल गरड,प्रमिला सुर्यवंशी,कृष्णदेव गोसावी,विद्याधर नामपल्ले,ऋतुराज होवाळ,मंजूषा काटकर,माधव देशमुख,भालचंद्र मोरे,जोतिराम पाटील,दत्तात्रय उंडाळे,सुधीर भोसले,महेश मस्के,संस्कार देशमुख,सारंग जाधव,शरयु बारसे,भाऊसाहेब कांबळे या कलाकारानी भूमिका केल्या आहेत.

डायरेक्टर – प्रणित देशमुख
Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *