कोरोनामुळे गुळपोळीच्या श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा रद्द

बार्शी (प्रतिनिधी) एप्रिल महिन्यात म्हणजे चैत्र पोर्णिमेला अर्थात हनुमान जयंतीला गुळपोळी ता .बार्शी येथे दरवर्षी होणारी श्री भैरवनाथ (जोगेश्वरी)यात्रा यावर्षी कोरोना महामारी मुळे रद्द करण्यात आली . याबाबत ग्रामपंचायत व देवस्थान कमि टिने यात्रा रद्दचा निर्णय घेतला आहे .

महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षत्र म्हणून गुळपोळी ची ओळख आहे.  श्री भैरवनाथ   महादेवाचा अवतार आहे . फार पुर्वीपासून गुळपोळीत श्री भैरवनाथाची यात्रा भरवली जाते . यात्रा काळात रविवारी सायंकाळी भैरवनाथ मंदिरात महाआरती केली जाते . चैत्र शुध्द व्दादशीला देव गावा बाहेर नेला जातो . नऊ दिवस घटस्थापना केली जाते . चैत्र पोर्णिमे दिवशी मध्य रात्रि पासून श्री भैरवनाथाला पुरण पोळीचा नैवद्य देऊन यात्रेचा प्रांरभ होतो . सकाळी ९ वाजता देवास गुळाच्या शेरणी ची सुरुवात होते ती दिवसभर चालू असते . भैरवनाथाची काठी घेऊन शेरण्या नेल्या जातात . सायंकाळी भैरवनाथाची आरती केली जाते , त्यावेळी गावातील ग्रामस्थ बाहेर गांवाहुन आलेले भाविक लोक आरतीसाठी मोठया संख्येने भैरवनाथ मंदिरात उपस्थित राहतात . आरतीनंतर प्रसाद वाटप केला जातो .
दुसऱ्या दिवशी सायंकाळी मानाची काठी घेऊन मानकरी मालवंडीहुन गुळपोळी येतात आणि कोरफळे गावातील भाविकाना आबीलचा गाडा किवा  माठ दिला जातो . भक्ति भावाने गुळपोळीच्या भैरवनाथ (जोगेश्वरी )देवाच्या दर्शनाला लोक येतात
तिसऱ्या दिवशी देवाचा छबिना काढून मिरवणूक काढण्यात येते . छबीण्यापुढे    पारंपारिक लोककलेची वेशभूषा करुन कार्यक्रम केला जातो , त्यामध्ये राम -लक्ष्मण सीता ,हनुमंत ,रामायण – महाभारत -पांडव इत्यादि कलेच्या स्वरुपात कलाकार आपली वेशभूषा सादर करतात . तरुणांचा उत्स्फूर्द सहभाग असतो .

कोरोना महामारी मुळे गुळपोळी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांची यात्रा होणार नाही . नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे . दुरून देवाचे दर्शन घ्यावे.
: शुभांगी नरखडे सरपंच ,गुळपोळी

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *