शिवाजी महाराजांची खरी शिकवण शिवाजीनगर मंडळाने जोपासली आहे – केशव घोगरे

वैराग (प्रतिनिधी)
स्वराज्यावर आलेली संकटे परतवून लावण्याचे जे सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते त्याचं अनुकरण आजच्या मावळयांनी केले पाहिजे. कोरोना रूपी महाभयंकर संकटाचा सामना करणार्‍या योद्धांचा सन्मान करून खऱ्या अर्थाने शिवाजीनगर जयंती उत्सव मंडळाने महाराजांची शिकवण जोपासली आहे . असे प्रतिपादन माजी उपसभापती – केशव घोगरे यांनी शिवजयंती निमित्त ”कोविड योध्दा सन्मान ” सोहळा प्रसंगी बोलताना केले .
वैराग येथे छत्रपती शिवाजीनगर मित्र मंडळाने शुक्रवार १९ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष -शिवाजी निकम होते .

कोविड योध्दा सन्मान सोहळयास संतोष निंबाळकर (माजी जि.प. सदस्य) , मकरंद निंबाळकर (माजी सभापती जि.प. )मंजुळा वाघमोडे(उपसभापती, पं . समिती बार्शी) नंदकुमार पांढरमिसे ,रणजित काशिद(एस.टी.ओ.)वैजिनाथ आदमाने(माजी ग्रा.पं. सदस्य) हरिश्चंद्र भोसले , डॉ. भारत पंके
ईस्माईल पटेल (जिलाध्यक्ष, मौ.आ.विचार मंच) संदिपान निंबाळकर , जनसेवा संघटनेचे -सुनिल पवार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते .
यावेळी कोविड योध्दा म्हणून खालील सत्कारमुर्तीचा शाल,श्रीफळ , सन्मानपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .

वैद्यकीय अधिकारी : डॉ. मजीद चौधरी ,डॉ. अजित सपाटे डॉ.प्रशांत दळवी ,डॉ. जयवंत गुंड ,डॉ. पवन गुंड डॉ.सुहास मोटे ,डॉ. संताजी देशमुख डॉ. सचिन चव्हाण

देशसेवा बजावून निवृत्त झालेले माजी सैनिक :
मेजर – अमोल धायगुडे , किशोर चौधरी ,दिपक खेंदाड ,जगन्नाथ आदमाने ,संभाजी जांभळे ,शिवाजी जाधव

आरोग्य विभागातील कर्मचारी :
वर्षा गोवर्धन ,मनिषा मुंढे ,
बालीका पाटील ,सुलभा मगर , वंदना मचाले ,सुषमा सट्टे ,आबासाहेब कांबळे , सतिश जिरगे ,अविनाश अंकुश , शिवाजी आवारे ,जगदीश ताकभाते ,प्रकाश गुंजाळ , बाबासाहेब स्वामी ,

पोलीस अधिकारी /कर्मचारी /होमगार्ड :
दत्तात्रय मस्के, दिलशाद सय्यद , शिवाजी जाधव ,संतोष टिपे , किशोर खस्टमील , शोभा कावरे

पत्रकार : आनंदकुमार डुरे , बलभिम लोखंडे ,
निलेश उबाळे , किरण आवारे ,कालिदास देवकते ,मुजमिल कोठाळकर , शिल्पकार -सुहास सुतार व श्रीकांत रेडे यांचा सत्कार करण्यात आला . सूत्रसंचालन महेंद्र लोंढे तर आभार बादशाह शेख यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष – बाबा माने (रड्डी ) व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *