शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा

बार्शी (प्रतिनिधी )
बार्शी तालुक्यात गेल्या १५ दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले .त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब पाहणी करून पंचनामे करावे अशी मागणी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी आगळगाव येथे शेतात पाहणी करून केली.

यावेळी मिरगणे यांनी सूरज डमरे,दिलीप डमरे या शेतकऱ्यांच्या शेतात जावून समक्ष भेट दिली व वस्तुस्थिती जाणून घेतली. शेतातील सोयाबीन,उडिद,मुगाचे संपूर्णतः नुकसान झाल्याचे पहायला मिळाले.त्यामुळे मिरगणे यांनी लगेच तातडीने जिल्हाधिकारी शंभरकर,अतिरिक्त जिल्हाधिकारी जाधव,प्रांताधिकारी निकम,तहसीलदार जमदाडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून झालेल्या नुकसानीची माहिती देऊन तात्काळ पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या.
प्रांताधिकारी निकम यांनी ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये शूटिंग व फोटो काढून ठेवावेत.

आगळगाव येथे सूरज डमरे,दिलीप डमरे यांच्या शेतात पाहणी करताना राजेंद्र मिरगणे सोबत पदाधिकारी कार्यकर्ते

भरपाई देण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचे निकम यांनी सांगितले.यावेळी मिरगणे यांच्यासोबत बिभीषण पाटील,अविनाश शिंदे,मांडेगावचे सरपंच पंडित मिरगणे,बाजार समितीचे संचालक कुणाल घोलप,संभाजी सोनवणे,शिरीष घळके,बबन गायकवाड,विजयसिंह देशमुख,आदी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *