शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या अन्यथा रस्त्यावर उतरू… शंकर गायकवाड

बार्शी(प्रतिनिधी)
मागील ३-४ दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून त्याची पाहणी करण्यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड
खामगाव येथे आले असता बोलताना सांगितले .

ते पुढे बोलताना म्हणाले की,मागील पंधरवाड्यात झालेल्या पावसामध्ये मुग,उडदाचे तर तीन दिवसाखालील पावसाने कांदा,सोयाबीन,कापसासह सर्वच शेतकऱ्यांचे ८०ते १००%नुकसान झालेले असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने पंचनामे न करता सरसकट जिरायत एकरी ५०हजार तर बागायतास १लाख रूपये लवकरात लवकर खातेवर जमा करावे,अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलने केली जातील व मंत्र्यांनाही घराबाहेर पडणे मुस्किल केले जाईल असा खणखणीत इशाराही गायकवाड यांनी यावेळी दिला, त्यावेळी शेतकरी संघटनेचे शरद भालेकर, सागर डोके, गुलाब लोखंडे, रामहरी लोखंडे, गणपत लोखंडे, हनुमंत लोखंडे, सौदागर लोखंडे, उमेश लोखंडे, हरी लोखंडे, भिमराव नलगे, नागनाथ लोखंडे, बाबासाहेब लोखंडे, सचिन लोखंडे, सतीश लोखंडे आदिंसह शेतकरी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *