विविध मागण्यांसाठी बार्शी-लातूर रास्ता रोको आंदोलन , मागण्यांची पुर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन

बार्शी(प्रतिनिधी)दि.१९
अतीवृष्टीचे सरकारने पंचनामे न करता सरसकट जिरायत एकरी ५० हजार तर बागायतीस १लाख रूपये लवकर खातेवर जमा करावे, सर्वच पिकांना शंभर टक्के पिकविमा मंजूर करा, जामगाव-वाणेवाडी-कुसळंब रस्ता बनवा, मागील सन २०१८-१९चा दुष्काळ निधी तात्काळ खातेवर जमा करा आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बार्शी-लातूर रस्त्यावरील वाणेवाडी फाट्यावर सकाळी १० ते ११ असा सुमारे एक तास रस्ता रोको करण्यात आला .

गायकवाड यांनी मागण्यांची पुर्तता लवकरच न झाल्यास राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलने केली जातील व मंत्र्यांनाही घराबाहेर पडणे मुस्किल केले जाईल असा खणखणीत इशाराही यावेळी दिला. मागण्यांचे निवेदन तहसिलचे प्रतिनिधी विशाल नलवडे,आय्युब शेख यांना देण्यात आले त्यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड, बापू गरदडे, समाधान यादव, शंकर सुर्वे, गणेश लावंड, विश्वास लोखंडे, यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी , कार्यकर्ते उपस्थित होते .

निवेदन देताना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड व शेतकरी दिसत आहेत

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *