आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन तूर्तास स्थगित – शंकरराव गायकवाड

कुर्डूवाडी(प्रतिनिधी) कुर्डूवाडी येथिल उपविभागीय कार्यालयाकडून विविध कृषी अनुदान योजनेमध्ये अफरातफर होत असून शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे . तसेच तत्कालीन कृषी अधिकारी – तळेकर यांचे कार्यकाळात राबविलेल्या सर्व अनुदानीत योजनांची तात्काळ सखोल चौकशी करावी यासाठी शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन केले .
उपविभागीय कृषी अधिकारी -तळेकर यांच्या कार्यकाळातील राबवण्यात आलेल्या सर्व अनुदानीत योजनांची तात्काळ सखोल चौकशी करावी . कांदा चाळ , कृषी अवजारे , फळबाग आदी सर्व शासकिय अनुदानीत योजना राबविताना आर्थिक घोटाळा होत असल्याबाबत शेतकऱ्यांनी संघटनेकडे तक्रार केली होती . त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकरराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सध्याचे उपविभागीय कृषी अधिकारी आर.एन.कांबळे यांना घेराव घालून धरणे आंदोलन करण्यात आले .
याबाबत लवकरच वरिष्ठांना कळवून चौकशी करून,अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देऊ असे लेखी आश्वासन श्री.कांबळे यांनी दिल्यानंतर आंदोलन तुर्तास मागे घेतले . मागण्यांची पुर्तता लवकर न झाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी दिला.
यावेळी शरद भालेकर,सचिन आगलावे,अमर पाटील,रामराव काटे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते

कुर्डूवाडी येथिल उपविभागीय कृषी अधिकारी आर.एन.कांबळे यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी
Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *