१६ डिसेंबरला होणार जिल्हयातील सरपंच पदाचे आरक्षण जाहिर

सोलापूर (प्रतिनिधी)कोवीड प्रतिबंधक शासन अधिसूचना व नियमाचे पालन करुन सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सन २०२० ते २०२५ या कालावधीच्या सरपंच पदाचे आरक्षण १६/१२/ २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता संबधित तालुका मुख्यालयाचे ठिकाणी सोडत पध्दतीने करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी मंगळवार ८ रोजी दिला आहे .

प्रवर्गनिहाय सरपंच पदाचे चिठ्ठीव्दारे आरक्षण काढणे कामी संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांना जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत .सरपंचाची आरक्षित पदे तालुक्यात दिलेल्या विविध प्रवर्गासाठी निश्चित करुन दिलेली जागा कोणत्या पध्दतीने आरक्षित करण्यात याव्यात याबाबत सविस्तर सूचनाही दिल्या आहेत. सोडतीसाठी तालुक्यातील मा. आमदार, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांना निमंत्रित करण्यात यावे. तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांना देखील सोडतीचे वेळी उपस्थित राहणेसाठी निमंत्रीत करण्याचे सांगितले आहे .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *