तुळशीदास नगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी – सुनीता अभिजित पाटील तर उपसरपंचपदी – अँड – दत्तात्रय थोरात बिनविरोध

नवनिर्वाचित सरपंच , उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .

वैराग (प्रतिनिधी) तुळशीदास नगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी – सुनीता अभिजित पाटील तर उपसरपंचपदी -दत्तात्रय रामकृष्ण थोरात यांची बिनविरोध निवड झाली आहे .
तुळशीदास नगर ता. बार्शी येथील सरपंच व उपसरपंच यांची निवड शुक्रवारी २६ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी -बी.बी. मुंढे (मंडळ अधिकारी, आगळगाव) यांचे अध्यक्षतेखाली झाली .नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य – सौ. लक्ष्मी विकास सोलनकर,श्री. मोहन ज्ञानदेव मुळे(आबा), श्री. संतोष नागनाथ राक्षे, श्रीमती. छाया बाबासाहेब पाटील सर्वांचे गुलालाची उधळण करित हार घालून सत्कार करण्यात आले .
आ.राजेंद्र राऊत ,वैरागचे माजी सरपंच -संतोष निंबाळकर,पं .स . सभापती -अनिल डीसले ,विठ्ठल सोलंकर ,संजय खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली . यावेळी बार्शी तालुका भाजप उपाध्यक्ष – नानासाहेब धायगुडे, भाजप वैराग शहर अध्यक्ष -शिवाजी सुळे, जगन्नाथ आदमाने मेजर,हरिशचंद्र निंबाळकर, कालिदास सोलनकर,पांडुरंग राऊत,पंडित काशीद ,हरिभाऊ सातपुते,तात्यासाहेब कापसे,विजय परदेशी, सर्जेराव सातपुते ,पांडुरंग काशीद ,प्रदीप जूनवनकर, बसलिंग खोबरे, किरण मोटे ,अमीर शेख,वसंत बनसोडे,आण्णा गाटे उपस्थित होते .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *