तीन साहेबांचे ‘धोरण’ सर्जापूर ग्रामपंचायतीने बांधले बिनविरोधचे “तोरण”

  • वैराग (प्रतिनिधी) : सर्जापूर ( ता. बार्शी ) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ‘जय जगदंबा शिक्षण संस्थेचे ‘ संस्थापक बाळासाहेब कोरके व त्यांचे जेष्ठ बंधू काकासाहेब कोरके आणि डीवायएसपी – आण्णासाहेब जाधव या तीघांनी गावकऱ्यांसमोर ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे धोरण मांडले, लागलीच या तिनही ‘साहेबांच्या ‘ धोरणाला गावकऱ्यांनी ‘आपलं यातंच भलं ‘ म्हणत गावाच्या विकासासाठी व एकीसाठी एकमुखाने संमती दर्शविली आणि कोणत्याही मतभेदाशिवाय ग्रामपंचायतीवर बिनविरोधतेचे ‘ तोरण ‘बांधले आणि यंदाचीही पंचवार्षिक निवडणूक ‘बिनविरोध ‘ झाली .
  • सुमारे दीड हजार लोकसंख्या असलेलं बार्शी तालुक्यातील व वैरागपासून अवघ्या ५ कि मी अंतरावरील गाव सर्जापूर . शंभर एक उंबऱ्याचं गांव (सर्जापूर आणि अन्य समावेशीत ) .गाव जरी लहान असले तरी दलित मित्र बाळासाहेब कोरके यांनी उभारलेल्या शिक्षण संस्थेमुळे गावाची ख्याती राज्यभर आहे . आजही हे गाव शिक्षणात स्वयंपूर्ण आहे .
  • येथील मतदार संख्या खूपच कमी असल्याने १९६१ पूर्वी सर्जापूर व अन्य विस्तारित भाग दुसऱ्या गावच्या ग्रामपंचायतीला जोडला होता . तेथूनच काही वर्षे गावगाडा चालायचा . पुढे १९६१मध्ये सर्जापूर स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली . या ग्रामपंचायतीसाठी हिंगणी, चिचखोपन आदी गावे जोडण्यात आली . ग्रामपंचायत स्थापनेपासून ६० वर्षात फक्त दोन वेळाच येथे निवडणूक झाली . म्हणजे तब्बल १० पंचवार्षिक निवडणूका ह्या बिनविरोध झाल्या आहेत .
  • २०१५मध्ये गावात बार्शीच्या नेत्यांनी लक्ष घातल्याने नको तितक्या टोकाची अघोरी निवडणूक झाली . मात्र, यावेळस काहीही झालं तरी ‘ यंदाची निवडणूक आपण बिनविरोधच काढायची ‘ असा बाळासाहेब कोरके, काकासाहेब कोरके आणि आण्णासाहेब जाधव या तीन ‘साहेबांनी ‘पक्का निर्धार केला . निवडणूक लढवावी वाटणाऱ्या जेमतेम लोकांची या तिघांनी वेगळी बैठक घेतली . त्या लोकांची समजूत काढली . गावकऱ्यांच्याही बैठका झाल्या आणि सर्वानुमते गावासाठी वेळ देणाऱ्या सदस्यांची ग्रामपंचायतीची नूतन सदस्य मंडळ गठित झाले . प्रेमाणे व एकोप्याने कोणत्याही मतभेदा शिवाय या तिघांनी गाव एकसंघ केले . ग्रामपंचायत यशस्वीपणे बिनविरोध केली . सर्वांच्या हिताचे नूतन सदस्य मंडळ अस्तीत्वात आले . कोणत्याही रुसव्या फुगव्याशिवाय एका विचाराने गाव एकत्र आले .विस्कटलेला गाव पुन्हा तीन साहेबांच्या विचारांना मान देऊन एकत्र आला आहे . एकसंध झालेला गाव आता गावात नक्कीच बदल घडणार … गावात एकीचं राजकारण होणार … आणि गाव पुढे सरकणार …या आशाळभूत नजरेने निरागस जनता पुन्हा गाव हाकणाऱ्या या तिन साहेबांकडे आणि त्याची कार्यवाही करणाऱ्या या नूतन कार्यकारणीकडे पाहात आहे .

नवनिर्वाचित सदस्य :
१ ) आप्पा गायकवाड २ ) दिपाली यादव ३ ) स्वाती गवळी ४ ) कुसुम सुरवसे ५ ) महेश जाधव ६ ) दुर्णाबाई देवकर ७ ) सचिन कांबळे

दृष्टिक्षेपात गांव …
१ ) ग्रामपंचायत स्थापना -१९६१
२ ) बिनविरोध पंचवार्षिक – ११
३ ) मतदार संख्या -८७४
४ ) लोकसंख्या -१४००
५ ) ग्रामपंचायत सदस्य संख्या -७

बाळासाहेब कोरके

काकासाहेब कोरके
आण्णासाहेब जाधव
Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *